Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
वाक्यप्रचार – मराठी शब्दकोश Phrases – Marathi Vocabulary
वाक्यप्रचार – मराठी शब्दकोश Phrases – Marathi Vocabulary

वाक्यप्रचार – मराठी शब्दकोश Phrases – Marathi Vocabulary

वाक्यप्रचार – मराठी शब्दकोश (मराठी व्याकरण मधील एक भाग)

Phrases – Marathi Vocabulary

This complete information or article is free, so friends you will not be charged any money for this article, this is completely free, so friends share this article as much as possible because all students will benefit from this article.

Friends if you like this article or you have benefited from this article in exam then don’t forget to come to our website notification and don’t forget to subscribe our YouTube channel, join Whatsapp group and telegram group.

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती तर मित्रांनो आजच्या या लेख मध्ये आपण मराठीतले जवळपास सर्व वाक्यप्रचार पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वाक्यप्रचार विचारला जाणारे प्रश्नाचे उत्तर योग्य रित्या देण्यात किंवा बरोबर सोडवता येतील / मदत होईल.
त्यासाठी तुम्हाला हा लेख बराच मदत करणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा तसेच तुमच्या मित्राला हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल. हे संपूर्ण माहिती किंवा लेख फ्री मध्ये आहे, तर मित्रांनो या लेख साठी तुम्हाला कोणतेही पैसे घेण्यात येणार नाही, तर हा संपूर्ण फ्री मध्ये आहे, तर मित्रांनो या लेख ला न जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्व विद्यार्थ्यांना या लेखाचा लाभ होईल.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल किंवा तुम्हाला परीक्षेत या लेखाचा फायदा झाला असेल तर आपल्या वेबसाईट नोटिफिकेशन ला आलो करायला विसरू नका तसेच आपल्या Youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हाट्सअँप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

‘अं’ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 1. अंग काढणे – एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे
 2. अंकित करणे – पूर्ण ताब्यात घेणे किंवा दुसऱ्याच्या आधीन असणे
 3. अंग घेणे –  लठ्ठ होणे
 4. अंग चोरणे – अगदी थोडे काम करणे किंवा कामात कुचराई करणे
 5. अंग झडणे – रोडावणे, क्रश होणे
 6. अंग झाकणे – एखाद्या कार्याशी असणारा आपला संबंध उघड न करणे
 7. अंग झाडणे – झिडकारणे ; नाकबूल करणे; जबाबदारी झटकणे किंवा अव्हेरणे
 8. अंग धरणे – बाळसे घेणे, तब्येत सुधारणे किंवा रुजणे
 9. अंग मोडून काम करणे – अतिशय कष्ट करून एखादे काम करणे
 10. अंग मोडून येणे – ताप येण्यापूर्वी कसकसणे
 11. अंग मुरडणे – दिमाख दाखविणे किंवा तोरा दाखविणे
 12. अंगद शिष्टाई करणे मध्येस्थि करणे
 13. अंग सावरणे – तोल सावरणे
 14. अंगाई गाणे – बाळाला झोपविणे
 15. अंगाचा तीळपापडी होणे – रागाने फणफण करणे
 16. अंगाचा भडका उडणे – खूप संतापने
 17. अंगाचा मळ काढणे – शुल्लक गोष्ट मिळवणे
 18. अंगाचे पाणी पाणी होणे फार कष्ट करणे
 19. अंगाची लाही लाही होणे – संतापाने लाल होणे
 20. अंगात त्रास न उरणे – शक्ती नाहीसी होणे
 21. अंगापेक्षा बोंगा मोठा – नाकापेक्षा मोती जड असणे
 22. अंगा बाहेर टाकणे – कामासी असलेला आपला संबंध तोडणे
 23. अंगारा लावणे – आशा दाखवून शेवटी निराशा करणे
 24. अंगाला हळद लावणे – विवाह होणे
 25. अंगावर काटा उभा राहणे – भीतीने अंगावर शहारे येणे
 26. अंगावर घेणे – जबाबदारी पत्करणे
 27. अंगावर जाणे – मरायला धावणे
 28. अंगावर मांस न राहणे – प्रकृती खालावणे किंवा रोडावणे
 29. अंगावर मुठभर मास चढणे – धन्यता वाटणे
 30. अंगावर येणे – एखादे कार्य बिघडून त्यांची अडचण सोसावी लागणे
 31. अंगावर शहारे येणे – खूप घाबरणे
 32. अंगावर शेकणे – नुकसान सहन करणे
 33. अंगावरून वारा जाणे – पक्षाघात होणे
 34. अंगी आणणे – बिंबवून घेणे किंवा शिकणे
 35. अंगी लागणे – फायदा होणे
 36. अंगीकार करणे – स्वीकारणे
 37. अंडी पिल्ली ठाऊक असणे – एखाद्याच्या गुप्त गोष्टीची माहिती असणे
 38. अंत पाहणे – कसोटी पाहणे किंवा छळणे किंवा गांजणे
 39. अंत लागणे – शेवट दिसणे किंवा खोली समजणे
 40. अंतर देणे – सोडून देणे, परित्याग करणे
 41. अंतर्मुख होणे – मनाशीच विचार करीत बसणे
 42. अंत:करण तीळतीळ तुटणे – अतिशय वाईट वाटणे
 43. अंत:करण विदीर्ण होणे – अत्यंत दुःखी होणे
 44. अंतर्धान पावणे – नाहीसे होणे
 45. अंथरून पाहून पाय पसरणे – उत्पन्नाच्या मानाने खर्च करणे

उदाहरण
१. अंग काढून – संसर्गाला घाबरून नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढून घेतले
. अंग चोरूणेअंग चोरून काम करणाऱ्या माणसाला कधीही चांगला अनुभव मिळत नाही

‘अ ‘ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 1. अ-वागणे वाईट मार्गास लागणे
 2. अक्काबाईचा फेरा येणे – अतिशय दारिद्र्यअवस्था येणे
 3. अक्कल खर्चणे – खूप विचार करणे
 4. अक्कल गुंग होणे – काहीही न सुचणे, मती गुंग होणे किंवा बुद्धी न चालणे
 5. अक्कल जाणे – बुद्धी नाहीसी होणे, काहीही न सूचने, विचार न करता कृती करणे
 6. अक्कल पुढे धावणे – बुद्धीचा योग्य प्रकारे वापर न करणे
 7. अक्कल मिळकत खाणे – दुसऱ्याचे एकूण वागणे किंवा दुसऱ्याच्या विचाराप्रमाणे वागणे / बोलणे
 8. अक्कल विकत घेणे – अनुभवातून आलेले शहाणपण
 9. अक्कल सांगणे – शहाणपण शिकवणे, चांगेल्या गोष्टी सांगणे
 10. अकलेचा खंदक – मूर्ख, बेअकली माणूस, विचार न करता काम करणारा
 11. अकलेचा कांदा असणे – बुद्धी न वापरता वागणे
 12. अकलेचे तारे तोडणे – ताळमेळ नसणारे बोलणे / अविचाराने बडबड करणे
 13. अकरावा गुरु होणे – भाग्य उजळणे
 14. अकरावा रुद्र असणे – अतिशय तापट स्वभाव असणे
 15. अकांडतांडव करणे – रागाने आदळआपट करणे किंवा रागाने विनाकारण आरडाओरडा करणे
 16. अक्रिताचा व्यवहार – भ्रष्ट व्यवहार करणे, नुकसानकारक व्यवहार करणे
 17. अखेर होणे – मरण पावणे
 18. अखेरी मारणे – शेवटचा डाव जिंकणे
 19. अगडीदगडी जीव घालणे – अडचणीत येणे
 20. अगा बांधणे – तर्क काढणे
 21. अग्निकांड घडवणे – कपटाने आग लावणे, लावालावी करणे, आगीत तेल ओतणे
 22. अग्निकाष्ठा भरणे – स्वतःस जाळून घेणे
 23. अग्रीदिव्य करणे – कठीण कसोटीस उतरणे, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अलौकिक अशी कृती करणे
 24. अग्नी देणे – मृतदेह पेटविणे, सरणावरील मूर्तदेहास पेटविणे
 25. अग्निप्रवेश करणे – सती जाणे, स्वतःस जाणून घेणे
 26. अग्नीसात होणे – अगीत नष्ट होणे
 27. अघळपघळ बोलणे – उगाच बडबड करणे बडबड करणे उ
 28. अचंबा वाटणे – चकित होणे 
 29. अचकल मीचकल खाणे – काहीही खाणे
 30. अचांगिणे बोलणे – चुकीचे बोलणे
 31. अजमाईसीस येणे – अनुभवास येणे, प्रत्ययास येणे, लक्षात येणे
 32. अटकेवर झेंडा लावणे – मोठा पराक्रम गाजवणे
 33. अट घालणे – शर्त घालणे
 34. अठरा विसवे दारिद्रय असणे – अतिशय दारिद्र्य असणे
 35. अडक्याची भवानी असणे – क्षुलक असणे
 36. अडणीवरचा शंख असणे – निरुपयोगी असणे
 37. अडकीत्यात सापडणे – दोन्हीकडून संकटात सापडणे
 38. अढच असणे – एखाद्याला वर चढवणे
 39. अढीच्या दिढी – अव्वाच्या सव्वा, फाजीलपणा
 40. अढी धरणे – अडून बसणे, एखाद्याविषयी मनात आकस बाळगणे
 41. अत्तर मुरणे – उगीच आव आणणे
 42. अंत्तराचे दिवे लावणे – खूप खर्च करणे, बेसुमार उधळपट्टी करणे
 43. अति तेथे माती – कोणत्याही गोष्ठीचा अतिरिक्त वाईट
 44. अतिप्रसंग करणे – अयोग्य वर्तन करणे
 45. अद्दल घडवणे – धडा शिकवणे
 46. अद्दल घडणे – चांगली शिक्षा मिळणे
 47. अद्वातद्वा बोलणे – वेडेवाकडे बोलणे, शिवीगाळ करणे, ताळतंत्र सोडून बोलणे
 48. अध:पतन होणे – विनाश होणे, संपूर्ण जाणे
 49. अध:पात होणे – वाईट स्थिती प्राप्त होणे
 50. अर्धचंद्र देणे – गचांडी देणे, उचलबांगडी करणे,
 51. अर्ध्या वचनात असणे – अज्ञापालनास तत्पर असणे, पूर्ण कह्यात असणे
 52. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे – थोड्याशा लाभाने आनंदीत होणे
 53. अनर्थ गुदरणे अचानक संकट ओढवण, एकाएकी मोठे संकट येणे
 54. अन्न अन्न करणे – खायला अन्न न मिळणे
 55. अन्नत्याग करणे – उपोषण करणे, काहीही न खाणे
 56. अन्नपाणी सोडणे – उपोषण करणे, आजाराने काहीही खाता न येणे
 57. अन्नाची लाज धरणे – उपकाराची जाणीव ठेवणे
 58. अन्नात माती कालवणे – स्वतःच्या निर्वाहाचे साधन नष्ट करणे,
 59. अन्नान्न दशा होणे – भीकेला लागणे
 60. अन्नावर तुटून पडणे – आधाशीपणे खाणे
 61. अन्नास जागणे – कृतज्ञ असणे, उपकाराची जाणीव ठेवणे.
 62. अन्नास मोताद होणे – उपासमार होणे, वाईट दिवस येणे, गरीबीत दिवस काढणे
 63. अन्नास लावणे – निर्वाहाचे साधन मिळवून देणे,
 64. अनाकानी करणे – दुर्लक्ष करणे
 65. अनुग्रह करणे – कृपा करणे, स्वीकार करणे, उपकार करणे
 66. अनुमान करणे – तर्क लावणे
 67. अपराध पोटात घेणे – क्षमा करणे
 68. अबदा धरणे – सांभाळ करणे
 69. अब्रूवर पांघरून घालणे – प्रतिष्ठा जपणे
 70. अब्रू वेशीवर टांगणे – बेअब्रू करणे
 71. अभय देणे जीवदान देणे, क्षमा करणे, सुरक्षितपणाची हमी देणे
 72. अभिवादन करणे – नमस्कार करणे
 73. अमरपट्टा घेऊन येणे – अमर असण्याचे आश्वासन मिळवणे, कायमस्वरूपी जिवंत राहणे
 74. अमृतकळा सोसणे – जीव घाबरा होणे
 75. अमृत शिंपडणे – गोड गोड बोलणे
 76. अमावास्या जीवनात येणे – जीवनात दुःखमय अंधकार येणे
 77. अरत्र ना परत्र – इहलोक ना परलोक
 78. अलभ्य लाभ होणे – दुर्मिळ गोष्ट मिळणे
 79. अल्ला अल्ला करणे – ईश्वराची करुणा भाकणे
 80. अल्लाची गाय होणे – अतिशय गरीब व निरूपद्रवी होणे, गयावया करणे
 81. अलीचा दरबार फिरणे – अत्यंत थाटमाट असणे
 82. अवगत होणे – माहिती होणे
 83. अवटणे ओहोटी लागणे
 84. अवघडल्यासारखे वाटणे – शरमल्या सारखे वाटणे
 85. अवदसा आठवणे – स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे, अविचाराने वागणे
 86. अवढणणे – वीट येणे
 87. अवलोडणे पाण्यात बुडणे
 88. अवतार संपणे – मृत्यू होणे, जन्मातून मुक्ती मिळवणे
 89. अवलंब करणे – अनुसरणे
 90. अवसान येणे – स्फुरण येणे
 91. अवाक्षर न काढणे – तोंडातून ब्र न काढणे, अक्षरही न बोलणे
 92. अव्हेरणे – नाकारणे
 93. अव्हेर करणे – दूर लोटणे
 94. असंगाशी संग करणे – नको त्या व्यक्तीशी संबंध येणे
 95. अस्तन्या सावरणे – हाणामारीस तयार होणे, सरसावणे, कामासाठी तयार होणे
 96. अस्मान ठेंगणे होणे – गर्वाने फुगून जाणे
 97. अस्मानाला भिडणे – अहंकार होणे; प्रगती होणे
 98. असे होणे – अवैद्य प्राप्त होणे
 99. अहमहमिका लागणे – चढाओढ लागणे
 100. अळंटळं करणे – कामचुकारपणा करणे, आळस करणे
 101. अक्षत देणे आमंत्रण देणे
 102. अक्षता देणे – लग्न होणे
 103. अक्षता पडणे – लग्न लागणे
 104. अक्षता पाठवणे – लग्नासाठी आमंत्रण देणे
 105. अक्षर वाड्मय असणे – चिरकाल टिकणारी साहित्यकृती
 106. अज्ञातवासात असणे – निर्जन स्थळी वास करणे

‘आ’ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 1. आंगवणे नवस करणे
 2. आंदकणे – नाउमेद होणे
 3. आंतरिक आच असणे- मनातील इच्छा असणे
 4. आंबट शौक करणे – भलत्यासलत्या चैनि करणे
 5. आईमाई करणे – गयावया करणे, मनधरणी करणे
 6. आकांत करणे – रडून आरडाओरडा करणे
 7. आकारास येणे – मार्गास लावणे
 8. आकाश ठेंगणे होणे – गर्वाने फुगून जाणे
 9. आकाशा पातळ एक करणे – फार आरडाओरडा करणे, क्षोभ किंवा कल्लोळ करणे, प्रयत्नाची पराकाष्टा करणे
 10. आकाश फाटणे – चोहोबाजूने संकट येणे
 11. आकाशाची कुऱ्हाड कोसळणे – परमेश्वराची अवकृपा होणे, सर्व बाजूंनी संकट येणे,
 12. आकाशाला गवसणी घालेणे – अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे
 13. आकाशाला झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम करणे
 14. आकाशाला ठीगळ लावणे – फार मोठ्या संकटाला धर्याने तोंड देणे.
 15. आखाड्यात उतरणे – विरोधकाशी सामना देण्यास तयार होणे
 16. आखूडशिंगी बहुदुधी – सर्व चांगल्या गोष्टी एकत्र असणे
 17. आखाड्यात उतरणे – एखाद्या वादास किंवा संघर्षास सिद्ध होणे, दोन हात करण्यास तयार होणे
 18. आख्यान मांडणे – कंटाळवाणी कथन करणे
 19. आग ओकणे – रागाने फटकळ बोलणे
 20. आग पाखंडाणे – शिव्याचा वर्षाव करणे, रागाने मोठा आवाजात बोलण
 21. अगीत उडी घालणे – एखाद्या संकट ओढून घेणे
 22. अगीत तेल ओतणे – भांडण विकोपास जाईल अशी तऱ्हेने भर घालणे
 23. आगीतून निघून फुफाट्यात पडणे – एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे
 24. आघाडीवर असणे – पुढे असणे
 25. आघाडी साधने – वेळ साधने
 26. आटापिटा करणे – प्रयत्नाची पराकाष्टा करणे
 27. आटे ढिले होणे – अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे
 28. आडपडदा न ठेवणे – मनमोकळ्यापणाने आपल्या सर्व गोष्टी सांगणे
 29. अडवा पालव घालणे – एखादे कृत्य गुप्तपणे करणे
 30. अडव्यात शिरणे मुख्य मुद्दा सोडून भलतेच बोलणे
 31. आड विहीर जवळ करणे – आत्महत्या करणे
 32. आडवे घेणे – एखादी गोष्ट सरळ सरळ असताना देखील त्यात व्यंग काढणे
 33. आडवे येणे – कार्यात अडथळा आणणे
 34. आडात सोडून दोर कापणे – विश्वासघात करणे
 35. आडून गोळी मारणे – दुसऱ्यामार्फत कार्य साधून घेणे
 36. आढेवेढे घेणे एखाद्या गोष्टीला एकदम तयार न होणे
 37. आतड्याला पीळ पडणे – कळकळ वाटणे, काळजाला पाझर फुटणे, दयेने कळकळणे
 38. आतडे तुटणे – जीव कळकळणे
 39. आत्मा थंड करणे – मन तृप्त होणे, करणे
 40. आत्मसात करणे – पूर्णपणे माहीत करून घेणे
 41. आधाधिणे – भीती वाटणे
 42. आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
 43. आनंदाला उधाण येणे – खूप आनंद होणे
 44. आनंदाला पारावार न उरणे – अति आनंद होणे
 45. आपल्या पोळीवर तूप ओढणे – आपलाच स्वार्थ साधने
 46. आपली पोळी पकविणे – फक्त आपलेच मत खरे म्हणणे, हेकेखोर स्वभाव
 47. आपलेच घोडे पुढे दामटणे – आपला स्वार्थ आधी साधून घेणे
 48. आफळासाफळ करणे – रागाने आदळआपट करणे
 49. आबाळ होणे हेळसांड होणे, दुर्लक्ष होणे
 50. आभाळ कोळसणे – फार मोठे अनर्थ ओढवणे
 51. आभाळ ठेंगणे होणे – अत्यानंद होणे
 52. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे – इतरांनी कष्टाने मिळवलेल्या गोष्टीवर चैन करणे
 53. आयुष्याची दोरी तुटणे – मृत्यू ओढवणे
 54. आव आणणे – अवसान आणणे, जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे
 55. आवळ्या-भोपळ्याची मोट बांधणे – भिन्न प्रवृत्तीच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे
 56. आवळा देऊन कोहळा काढणे – लहान वस्तू देऊन एखाद्याकडून मोठी वस्तू उकळणे
 57. आ वाचून पाहणे – आश्चर्याने थक्क होऊन पाहणे
 58. आसन जमणे – चांगले जम बसणे, स्थिरता येणे
 59. आसन डळमळणे – बसलेल्या जम विस्कटने
 60. आहारी जाणे पूर्ण ताब्यात जाणे
 61. आहुती देणे – प्राणापर्ण करणे
 62. आळ घेणे – दोषरोप करणे, खोटे आरोप करणे
 63. आळा घालणे – मर्यादा किंवा नियंत्रण घालणे

‘इ ‘ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 1. इंगा जिरविणे – अद्दल घडवणे
 2. इंगा दाखवणे – गर्व दूर करणे, एखाद्याची खोड मोडण्यासाठी आपली ताकद दाखवणे, जबर बसविणे
 3. इंगळ्या डसणे – मनाला झोंबणे, वेदना होणे
 4. इकडचा डोंगर तिकडे करणे – फार मोठे कार्य पार पाडणे
 5. इजा बिजा  तीजा – एका मागून असे तीन वेळा
 6. इ (वि)टामाती वाहने – हलके शरीरिक कष्ट करणे
 7. इडापिडा टळणे – सर्व संकटे, त्रास दूर होणे,
 8. इतरपितर काढणे – शिव्या देणे
 9. इतिश्री होणे – शेवट होणे
 10. इतिश्री करणे – शेवट करणे
 11. इन्कार करणे – नकार देणे
 12. इमानास जागणे – कृतज्ञता पाळणे, सचोटीने वागणे, वचन पाळणे
 13. इरेस पडणे – अडचणीत सापडणे, गोत्यात येणे
 14. इरेस पेटणे – चुरशीने कंबर कसून सज्ज होणे, जिद्दीने कार्यारंभ करणे

‘ई’ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 • ईप्सित साधने – इच्छिलेले साधने

‘उ’ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

 1. उंटावरचा शहाणा – बेजबाबदारपणे मूर्खपणाची सल्लामसल्लत देणारा
 2. उंटावरून शेळ्या हाकणे – शहाणपणाने दूर राहून एखादे काम करण्यासाठी इतरांना उपदेश करणे
 3. उंबरठे झिजवणे – हेलपाटी मारणे
 4. उंबराचे फुल – कचित / किंचित भेटणारी व्यक्ती, दुर्मिळ गोष्ट
 5. उकळ्या फुटणे – अनुकूल प्रवृत्ती होणे, मनोमन आनंद घेणे
 6. उकिरडे फुंकणे – अत्यंत हीन गोष्ट करणे
 7. उखळ पांढरे होणे – वैभव प्राप्त होणे
 8. उखाळ्यापाखाळ्या काढणे – एकमेकांचे दोष काढणे
 9. उगीदुगी करणे – मध्ये-मध्ये बोलणे
 10. उघडा पडणे – निराधार होणे
 11. उंचबळून येणे – भावना अनावर होणे
 12. उच्चाटन करणे – नष्ट करणे
 13. उचल खाणे – एखादी गोष्ट करण्यास प्रवृत होणे, एकाएकी कामाला लागणे
 14. उचलबांगडी करणे – हाकलून देणे, कामावरून कमी करणे, एखाद्याला त्याची मनाविरुद्ध दुसरीकडे नेणे
 15. उचलून गोष्ट सांगणे – विरोध करणे / दर्शवणे
 16. उच्छाद मांडणे – भांडवून सोडणे, त्रास देणे
 17. उजेड पाडणे – मोठे काम करणे, यश मिळवणे, खूप कर्तबगारी दाखवणे
 18. उट्टे काढणे सूड घेणे
 19. उडत्या पाखराची पिसे मोजणे – अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखविणे
 20. उणे उत्तर देणे – अपमानकारक जबाब देणे किंवा उलटून बोलणे
 21. उजवा हात असणे – अत्यंत विश्वासू व तत्पर मदतनीस असणे
 22. उतराई होणे उपकारांची फेड करणे
 23. उतरत्या पायरीस लागणे – ऱ्हास होत जाणे
 24. उतू जाणे – अति होणे, नाशक होणे
 25. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे
 26. उदक सोडणे – त्याग करणे, एखाद्या गोष्टीचा नाद सोडणे
 27. उदरी शनी येणे – अचानक द्रवलाभ होणे
 28. उदो उदो करणे – प्रशंसा करणे
 29. उद्धार करणे – शिव्या देणे, वाईट स्थितीतून चांगल्या स्थितीत आणणे
 30. उधाण येणे भरती येणे, ओसंडून वाहने
 31. उन्मळून पडणे – मुळासकट कोसळणे, निराश होणे
 32. उन्हाची लाही फुटणे – अतिशय कडक ऊन पडणे
 33. उपमर्द करणे – अपमान करणे
 34. उपपावन करणे – बाजू मांडणे
 35. उपर करणे – मदत करणे
 36. उपर ठेवणे – वरचष्मा राखणे
 37. उपसर्ग होणे – त्रास होणे
 38. उपार्जन करणे – खर्चावयास देणे
 39. उपसमार होणे – खायला अन्न न मिळणे
 40. उभे जाळणे – फार छळणे
 41. उभा इंद्र करणे एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे
 42. उभा दावा करणे – कायमचे वैर करणे
 43. उभे धरणे – कडक शिस्त लावणे
 44. उमाळा येणे – गहिवरून येणे, मायेची भावना उंचबळून येणे
 45. उरात धडकी भरणे – अतिशय घाबरणे
 46. उरावर घेणे – जबाबदारी स्वीकारणे
 47. उरावर धोंडा ठेवणे – स्वतःचे दुःख दाबून ठेवणे
 48. उराशी धरणे – प्रेमाने कवटाळणे
 49. उरीपोटी धरणे – प्रेमाने समजूत घालणे
 50. उरी फुटणे – अतिश्रमामुळे त्रास होणे, अतिशय दमून जाणे
 51. उलट्या काळजाचा – दुष्ट माणूस
 52. उलटी अंबारी हाती येणे – भिक मागण्याची पाळी येणे
 53. उलटी पूजा करणे – हजेरी घेणे; समाचार घेणे
 54. उल्हागा देणे – टोमणा देणे
 55. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे – कधी कोणाला काहीही न देणे, अत्यंत कृपणवृती
 56. उषा फाकणे – उजाडणे; सूर्योदय होणे
 57. उष्टेखरकटे काढणे – अवभिष्ट काम निस्तरणे
 58. उसने पारणे फेडणे – सूड उगवणे

‘ऊ’ पासून सुरू होणारे वाक्यप्रचार

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *