चालू घडामोडी March 2023 | Current Affairs March 2023
नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचा स्वागत आहे आपल्या या official website वरती तर मित्रानो या लेख मध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत,
Daily current Affairs in Marathi – पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती, ज़िल्हा परिषद भरती, भूमी अभिलेख भरती, MPSC भरती, लिपिक भरती, बँक भरती, रेल्वे भरती, DVET, Mahagenco, Mahatransco, Mahavitran, Contenment Board, Indian Army Bharti, Indian Navy Bharti, India Air Force Bharti, Agniveer Bharti, Arogya Vibhag Bharti, Police Bharti, Vanrakshak Bharti, Talathi Bharti, Home Guard Bharti, ZP Bharti, Clerk Bharti, Bank Bharti, Railway Bharti, SCC च्या विविध भरती चालूघडा मोडी, सामान्य विज्ञान (GK ) व इतर माहितीव साठी उपयुक्त असे दररोजचे चालू घडामोडी पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपला website नोटिफिकेशन allow करा आणि चालू घडामोडी चे उपटेस दररोज मिळवा – निशुक्ल माहिती पहा.
Latest Current Affairs, Latest GK, General Knowledge, Static Gk And other information
24 मार्च 2023 :
इजिप्त ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला
आयकर विभागाने करदात्यासाठी मोबाईल ॲप AIS लॉन्च केला
भारत आणि टानझानिया यांना भारतीय रिझर्व बँक कडून त्यांच्या संबंधित राष्ट्रीय चलनाचा द्विपक्षीय व्यापार सेटलमेनमध्ये वापर करण्यासाठी मान्यता मिळाली.
आश्रिर ग्रोव्हरने क्रिकेट फँटसी स्पोर्टस अँप CrikPe लॉन्च केले
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत घोषणा केली की नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे NISAR नावाचा पृथ्वी विज्ञान उपग्रह तयार केला
भारतीय पॅरालिम्पिक समितीने मेकर्स हाइव्ह आणि विले स्पोर्टसोबत सामंजस करार केला
गार्डन रिच शिफ्टबिल्डर्स अँड इंजिनियर्स या भारतीय जहाज बांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठी “देशातील सर्वात शांत जहाज” असल्याचा दावा केलेल्या जहाज आयएनएस Androth लॉन्च केली आहे
.
कोकण 2023 नावाचा वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव भारतीय नौदल आणि रॉयल्स नेव्ही यांच्या 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता.
अनुराग बहर यांनी “अ मॅटर ऑफ द हार्ट: एज्युकेशन इन इंडिया” हे नवीन पुस्तक लिहिले आहे
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो व मानवी हक्काचे एकूण उल्लंघन आणि पीडितांच्या प्रतिष्ठेसाठी सातत्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस स्मरणार्थ साजरा केला जातो
23 मार्च 2023 :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित “स्टॅच्यू ऑफ नॉलेज” बसवण्यास सरकारने मान्यता दिली आहे – 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंच पुतळ्याचे अनावर होणार आहे, हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आला असून त्यांचा 131 व्या जयंतीच्या एक दिवशी आधी हा समारंभ होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत नवीन ITU क्षेत्रीय कार्यालय आणि इनोव्हेशन्स सेंटरचे उद्घाटन केले
ग्रीन टग ट्रांझिशन प्रोग्राम (GTTP) लॉन्च करून आणि 2030 पर्यंत “ग्लोबल हब फॉर ग्रीन शिप” बिल्डिंग बनवण्याचे उद्दिष्टे सेट करून जागतिक जहाज बांधणी उद्योगात अग्रगण्य बनण्याचे भारताचे ध्येय आहे
आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा सरमा यांनी राज्यात मिशन लाइफस्टाईल फॉर द एन्व्हार्नमेंट चे उद्घाटन केले
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पायाभरणी समारंभात भुवनेश्वर, ओडीसा येथे “ग्रीन फिल्ड डेटा सेंटर” आणि “एंटरप्राईस कॉम्प्युटिंग & सायबर सुरक्षा” प्रशिक्षण संस्थाची स्थापना केली
हुरून रिसर्च प्लॅटफॉर्म ने जाहीर केलेल्या जागतिक टॉप 10 यादी – खाली पहा 1. इलान मस्क (Bn$205) 2. जेफ बेझोस (Bn$१८८) ३. बर्नार्ड अर्नालट्स 9. मुकेश अंबानी आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीला विशेष 2023 नुसार QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये टॉप 50 अभियांत्रिक संस्थेमध्ये स्थान देण्यात आले आहे
महिला हॉकी स्टार राणी रामपाल यांच्या नावावर स्टेडियम चे नाव देण्यात आले आहे – एम सी एफ रायबरेलीने हॉकी स्टेडियम चे नाव बदलून “रानीज गर्ल्स हॉकीस तर्फ “असे नाव ठेवले आहे.
D आणि P आव्हानुसार डॉलर १.१ अब्ज मूल्यांक असलेल्या आयपीएल भारतातील पहिली युनिकॉर्न बनला आहे
2023 फॉर्मुला वन सिझनच्या सौदी अरेबिया ग्रँड पिक्स 2023 मध्ये, सर्जीओ पेरेझेने प्रभावी कामगिरी केली आहे आणि त्याने पहिला विजय मिळवला
23 मार्च जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो व तसेच भारताच्या स्वातंत्र साठी प्राण आहुती देणाऱ्या हुतात्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो
22 मार्च 2023 :
दिल्ली हैदराबाद हाऊस मध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशीदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषद साठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. G7 परिषद हिरोशिमा येथे होणार आहे
डॉक्टर जितेंद्र सिंग केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी आशियातील सर्वात मोठ्या चार मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे देवस्थळ उत्तराखंड येथे उद्घाटन केले – याची निर्मिती आर्यभट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्स ने केली आहे
मर्लिन ग्रुपने कोलकत्ता येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर विकसित करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशनशी भागीदारी केली आहे जे याचे – 3.5 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र असेल – Rs१५०० कोटी रुपयाची गुंतवणूक होईल
पंतप्रधान शेख हसीना यांनी कॉक्स बाजारामधील पेकुआ येथे बांगलादेशच्या पहिली पाणबुडी तळ “BNS शेख हसीना” चे उद्घाटन केले
मनमित के नंदा यांची इन्व्हेस्ट इंडिया चे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.
CEAT चे MD आणि CEO म्हणून अर्णव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली
कॉल कॉपरेट तपास आणि जोखीम सल्लागार कंपनीच्या आव्हालानुसार अभिनेता रणवीर सिंगला 2022 मधील भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून घोषणा करण्यात आली आहे – “सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2022: बियोन्ड द मेनस्ट्रीम” या शीर्षकाच्या अहवालात रणवीर सिंग यांचे ब्रँड मूल्य $181.7 दशलक्ष असल्याचे दिसून येते
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2023 नुसार भारत १२६ व्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर फीनलँड हा सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वात आनंद देश राहिला आहे.
नेपाळी क्रिकेटपटू आसिफ शेख 2022 च्या ख्रिस्तोफर मार्टिन – जेनकिन्स रिपोर्ट्स ऑफ क्रिकेट पुरस्कार जिंकला.
भारतीय क्यू स्पोर्ट्स चॅम्पियन पंकज अडवाणीने कतार बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन एकादमी येथे झालेल्या अंतिम सामन्यात १०० अप फारमॅटमध्ये आपले आशियाई बिलियर्ड्स विजेतापत कायम ठेवले आहे
आफ्रिका-भारत फिल्ड प्रशिक्षण व्यायाम (AFINDEX – 2023) बोत्सवाना, इजिप्त,घाना, नायजेरिया आणि टांझानियासह 23 आफ्रिकन देशातील शंभर सहभागीच्या सहभागाने सुरुवात झाली आहे
22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो
21 मार्च २०२३ :
भारतीय उद्योगपती श्री रतन टाटा यांना ऑस्ट्रेलिया भारत द्विपक्षीय संबंधांमध्ये विशेषता व्यापार, गुंतवणूक आणि परोउपकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया च्या जनरल डिव्हिजन मध्ये मानक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स मध्ये “जेफ्री बावा : इज इसेन्शिअल टू बी देअर” या प्रदर्शनाचे उद्घाटन केले
राष्ट्रीय युवा परिषद 2023 भारताच्या जी 20 अध्यक्ष खाली आयोजित करण्यात आली
रोहन बोपण्णा , 43 वर्षीय भारतीय टेनिसपटू आणि त्यांचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडें हेह ऐटीपी मास्टर 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात जुनी जोडी बनली आहे
DRDO ने हुमन्स फॅक्टर्स इंजिनिअरिंग इन मिलिटरी प्लॅटफॉर्म या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ : जनरल अनिल चव्हाण, DRDO चे मुख्यालय : दिल्ली
21 मार्च जागतिक कविता दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो, हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा केला जातो, तसेच आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस म्हणून साजरा केला जातो, तसेच वर्ल्ड डाऊन सिंड्रोम दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो व तसेच वैदिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून मी साजरा केला जातो
19 & 20 मार्च २०२३ :
राजस्थानच्या मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 19 नवीन जिल्हे आणि 03 नवीन विभागाची १७ मार्च रोजी घोषणा केली.
- राजस्थान मध्ये एकूण 50 जिल्हे आणि 10 विभागाची आता निर्मिती झाली आहे
- नवीन 19 जिल्ह्याची लिस्ट खाली पहा – अनुपगड, बालोत्रा, बेवार, डिंग, दीडवाना कुचमन, दुडू, गंगापूर शहर, जयपुर उत्तर, जयपूर दक्षिण,जोधपुर पूर्व, जोधपुर पश्चिम, केकरी, कोटपुटल-बेहरोर, खैरथल, निम का ठाणे, फलोदी, सालूंबर, सांचोर आणि शहापूरा
- सिकर, बासवाडा आणि पाली हे तीन नवीन प्रशासकीय विभाग आहेत
- जयपूर जिल्ह्यातून जयपूर उत्तर, जयपूर दक्षिण, दुडू आणि फलोदी जिल्हे तयार केले व जोधपूर जिल्ह्यातून जोधपूर पूर्व, जोधपूर पश्चिम आणि कोटपुतली-बेहरोर जिल्हे तयार करण्यात आले आहेत
- राजस्थानचे राज्यपाल : कलराज मिश्रा
- .राजधानी : जयपूर
नेपाळचे तिसरे उपराष्ट्रपती राम सहाया प्रसाद यादव ही बनले आहेत – राजधानी
काठमांडू, चलन : नेपाळी रुपया & पंतप्रधान : पुष्पकमल दहल
ललित कुमार गुप्ता यांची कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चे सीएमडी (CMD) म्हणून नियुक्त करण्यात आले
लक्सरणे विराट कोहली ची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली
जी कृष्णकुमार यांची भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
ग्लोबल टुरिझम इंडेक्स मध्ये भारत तेरावा क्रमांक आहे – पहिला नंबर अफगाणिस्तान
भारताच्या जी 20 अध्यक्ष खाली B20 ची दुसरी बैठक 18 व 19 मार्च रोजी गंगाटोक सिक्कीम येथे होणार आहे G20 म्हणजे Startup20 Engagement Group.
पीएम नरेंद्र मोदींनी ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स उद्घाटन केले
हरिद्वार येथे पशुवैद्यकीय आणि आयुर्वेद या विषयावर आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनाचा उद्घाटन झाली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार टीम पेनने खेळातून निवृत्तीची घोषणा केली
बापन्ना रमेश शेलार यांनी श्रीलंकेतील तलाईमन्नार ते तामिळनाडूतील धनुषकोटी पर्यंत पोहोण्याच्या 21 वर्षाच्या गटातील सर्वात वेगवान भारतीय बनून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे
20 मार्च हा जागतिक मौखिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो व तसेच इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणून पण साजरा केला
18th मार्च २०२३ :
NDIAai इकोसिस्टम AI मानवी इतिहासातील बदलाचा सर्वात महत्त्वाचा चालक बनेल – INDIAai हे भारतासाठी एक राष्ट्रीय AI पोर्टल आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) यांचा संयुक्त उपक्रम आहे.
चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला. (राजधानी : बीजिंग, सर्वात मोठे शहर लोकसंख्येनुसार: शांघाय : अधिकृत भाषा : चीनी चलन : युआन /Yuan)
भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे – हे पाईपलाईन पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आणि बांगलादेश मधील पर्वातपूर यांना जोडणारी 130 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बांधण्यात आली आहे – ( राजधानी : ढाका / राजभाषा
और राष्ट्रभाषा : बंगाली, मुद्रा / चलन : टाका )
पोलाद मंत्रालयाने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (पळी) योजनेअंतर्गत विशेष स्टील उत्पादनासाठी 27 कंपन्यासोबत 57 सामंज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाला मान्यता दिली
इराणी चषक 2022-23 रेस्ट ऑफ इंडियाने जिंकला. (राजधानी व सर्वात मोठे शहर :
तेहरान, चलन : इराणी रियाल)
शिक्षण मंत्रालयाने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये (61.8%) सर्वात कमी साक्षरता आहे आणि केरळमध्ये भारतातील सर्वाधिक साक्षरता दर 94% आहे ( Bihar – राजधानी व सर्वात मोठे शहर : पटणा, राज्यपाल : राजेंद्र आर्लेकर, मुख्यमंत्री : नितीश कुमार, उपमुख्यमंत्री : तेजस्वी यादव & Kerala – राजधानी व सर्वात मोठे शहर : तिरुवनंतपुरम, गव्हर्नर : आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री : पिनराई विजयन (सीपीआय(एम)))
2023 मधील जगातील महान ठिकाणांची TIME यादी जाहीर, 2 भारतीय ठिकाणे यादीत आहेत – मयूरभंज (ओडिशा) आणि लडाख
शिवशंकरी, प्रसिद्ध तमिळ लेखक, सरस्वती सन्मान 2022 ने सन्मानित करण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील रिक्त पदांमध्ये 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे
रचना बिस्वत रावत यांनी लिहिलेले “बिपिन: द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म” हे पुस्तक प्रकाशित झाले
श्री राजीव मल्होत्रा आणि श्रीमती विजया विश्वनाथन यांचे स्नेक्स इन द गंगा हे पुस्तक प्रकाशित झाले.
18 मार्च हा जागतिक पुनर्वापर दिन व ऑडिनन्स फॅक्टरी Day म्हणून साजरा केला जातो
17th मार्च २०२३ :
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कर्नाटकातील बेंगलोर येथे AgriUnifest उद्घाटन केले (Karnatak – राजधानी : बेंगलुरु, राजभाषा कन्नड, राज्यपाल : थावरचंद गहलोत मुख्यमंत्री : बसवराज बोम्मई)
भारतीय रेल्वे 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक होणार आहे
सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (MSMEs) विशिष्ट उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, भारताच्या केंद्र सरकारने MSME स्पर्धात्मक (LEAN) कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती सादर केली
राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर के कृतीवासन यांची TCS च्या CEO नियुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Viacom18 ने माजी कर्णधार एमएस धोनीला त्यांचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून घोषित केले
दीपक मोहंती यांची PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) चे अध्यक्ष म्हणून आणि ममता शंकर यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंगने वर्षातील सर्वोत्तम गव्हर्नर म्हणून निवडल्या गेले. (मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र स्थापना इ.स. १९३५ गव्हर्नर: शक्तिकांत दास )
आरबीआय, सेंट्रल बँक ऑफ यूएई यांनी आर्थिक उत्पादने आणि सेवांमध्ये नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
IDFC FIRST बँक, भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये स्पर्धा करणार्या मुंबई इंडियन्स या फ्रँचायझी क्रिकेट संघाची अधिकृत बँकिंग भागीदार बनली आहे
दिल्ली विमानतळ दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरले.
17 मार्च हा वर्ल्ड स्लिप डे म्हणून साजरा केला जातो
16th मार्च २०२३ :
अटल इनोवेशन मिशन ATL सारथी लॉन्च केली – अटल इनोवेशन मिशन भारतभरातील शाळेमध्ये तरुणांना मनात जिज्ञासा, सर्जनशीलता & कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी अटल टीकरिंग लायब्ररी (ATL) स्थापन करत आहे
आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आधारातीथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला
उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताचची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
अमेरिकेच्या सिनेट समितीने एरीक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली (राजधानी वॉशिंग्टन डी.सी., सर्वात मोठे शहर : न्यू यॉर्क शहर, अधिकृत भाषा: इंग्लिश भाषा, राष्ट्रप्रमुख जोसेफ बायडेन, जुनियर (राष्ट्राध्यक्ष) : राष्ट्रीय चलन : अमेरिकन डॉलर (USD))
18 देशातील बँकांना रुपयांमध्ये व्यापार करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाची मजुरी मिळाली (मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, स्थापना : १९३५ , गव्हर्नर: शक्तिकांत दास )
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने ब्लासम महिला बचत खाते सुरू केली
भारत आणि जागतिक बँक 04 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॅरिटोर प्रकल्पाची बांधकामासाठी कर्ज करार साजरी केली – या प्रकल्पासाठी $ १,२८८.२४ दशलक्ष कोटी. हे कॅरीडोर हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांमधून एकूण 781 किलोमीटर लांबीची बांधकाम केला जाईल
फिफाच्या अध्यक्षपदी जियानी इन्फँटिनो यांची पुन्हा एकदा निवड झाली.
16 मार्च हा भारतीय, राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो
15th मार्च २०२३ :
रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले – उत्तराखंड ची स्थापना ९ नोव्हेंबर 2000, उत्तराखंडचे मुख्यमंत्री : पुष्पकार सिंह धामी उत्तराखंडची राजधानी : गुरुमित सिंगउत्तराखंडचे राज्यपाल : भाररिसैन (उन्हाळा) डेहराडून (हिवाळी)
विको लॅबोरेटरीजचा नवा ब्रँड अँम्बेसेडर सौरभ गांगुली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी “विको टर्मरिक सेविंग क्रीम बेसचे नवे ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. (विको कंपनीचे संचालक अमित पेंढारकर)
भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश – 01st – चाड, 02nd – इराक & 3rd पाकिस्तान प्रदूषित देशाचे नंबर आहेत
डेन्मार्क CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) आयात करणारा आणि समुद्राखाली दफन करणारा पहिला देश ठरला – (मुद्रा / चलन : डेनिश क्रोन राजधानी : कॉपनहेगन)
तबलेश पांडे व एम जगन्नाथ यांची जीवन विमा कंपनी / LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. (LIC ची स्थापना १ सप्टेंबर 1956, LICचे मुख्यालय : मुंबई, LICचे अंतरिम अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती)
अमिताव मुखर्जी यांनी NMDC चे CMF म्हणून अतिरिक्त कारभार स्वीकारला आहे (NMDC मुख्यालय: हैदराबाद & NMDC ची स्थापना: 1958)
IDFC म्युच्युअल फंडाने स्वतःला बंधन म्युच्युअल फंड असे नाव दिले
Space X ने 40 OneWeb इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले.
भारत सिंगापूर संयुक्त सराव बोल्ड कुरुक्षेत्र जोधपूर येथे संपन्न झाला
15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन व आंतरराष्ट्रीय गणित दिवस & Pi दिवस म्हणून साजरा केला जातो
14 मार्च २०२३ :
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेंगळुर मध्ये मिथेनॉलवर चालणारी पहिले बसचे अनावरण केले (Karnatak – राजधानी : बेंगलुरु, राजभाषा कन्नड, राज्यपाल : थावरचंद गहलोत मुख्यमंत्री : बसवराज बोम्मई)
सांस्कृतिक मंत्रालयामार्फत फिनान्शिअल असिस्टंट टू व्हेटरन ॲक्टर्स ही योजना सुरू करण्यात आली
देशातील 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या दिगज्ज कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय दिग्गज कलाकारासाठी आर्थिक सहाय्य नावाचे एक योजना जारी करण्यात आली
FDIC ने सिलिकॉन व्हॅली बँकेचे CEO म्हणून माजी फॅनी माई प्रमुख टिम मायोपोलोस यांची नियुक्ती केली.
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 साठी MC मेरी कोम, फरहान अख्तर यांची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड झाली. – नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुल 15-26 मार्च दरम्यान IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन होणार आहे.
13 आणि 14 मार्च 2023 रोजी, हिंद महासागर क्षेत्र ला पेरोस या बहुपक्षीय सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केली. रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल, फ्रेंच नौदल, भारतीय नौदल, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्स, रॉयल नेव्ही आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही या कार्यक्रमात सहभागी होतील
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष – गांधीयन युग या पुस्तकाचे प्रकाशन केले. (स्थापना : 1 Oct 1937
भारताचे सरन्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, कार्यालयाची मुदत: (DoA) 13-05-2016 ते (DoR) 10-11-2024))
14 मार्च – नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस.
वंदे भारत एक्सप्रेस आता आशियातील पहिली महिला लोकोमोटिव्ह पायलट सुरेखा यादव चालवत आहे. सोलापूर ते महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) पर्यंत यादव यांनी वंदे भारत एक्स्प्रेस चालवली.
12 & 13 मार्च २०२३ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील हुबली येथील श्री सिद्धारुडा रेल्वे स्थानकावर 1.5 किलोमीटरचा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म उद्घाटन केले (राजधानी : बेंगलुरु, राजभाषा कन्नड, राज्यपाल : थावरचंद गहलोत मुख्यमंत्री : बसवराज बोम्मई)
0 ते 18 वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे, राज्यपाल : रमेश बैस)
टेक महिंद्राने इन्फोसिसचे माजी अध्यक्ष मोहित जोशी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
भारत सरकार ने LIC चे अंतरिम अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती केली. (LIC ची स्थापना: 1 सप्टेंबर १९५६ & LIC मुख्यालय: मुंबई.)
अशोक लेलँडने तामिळनाडूमधील होसूर प्लांटमध्ये 100 टक्के महिला कर्मचाऱ्यांसह “सर्व महिला उत्पादन लाइन” सुरू केली आहे. (राजधानी : चेन्नई, राज्यपाल : रविन्द्र नारायण रवि, मुख्यमंत्री एम के स्टालिन (DMK))
भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS सह्याद्रीने अरबी समुद्रात फ्रेंच नेव्ही (FN) जहाजे FS Dixmude, Mistral Class Amphibious Assault Ship आणि FS La Fayette, La Fayette क्लास फ्रिगेटसह मरिनटाईम पार्टनरशिप एक्सरसाईज (MPX) मध्ये भाग घेतला. भागीदारी सराव 10-11 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.
RRR च्या “नाटू नाटू” ला 95 व्या अकादमी पुरस्कारांचे सर्वोत्कृष्ट ओरीजनल सॉंग म्हणून पुरस्कार मिळाला.
द एलिफंट व्हिस्परर्सने 95 व्या अकादमी पुरस्कारांचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जिंकला आहे.
04th March 2023
राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ‘कॅच द रेन 2023’ मोहीम सुरू करण्यात आली – “जल शक्ती से नारी शक्ती” या स्मरणार्थ तिकिटाचे अनावरण केले.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सव चौथा आवृत्ती राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे भारताच्या संसदेत आयोजित करण्यात आली होती.
पोलाद आणि खाण मंत्री यांनी राज्य विधानसभेत माहिती दिली की देवगड, केओंझार आणि मयूरभंजसह ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत. – पोलाद आणि खाण मंत्री : प्रफुल्ल कुमार मल्लिक
नोबेल पारितोषिक विजेते अँलेस बिलियात्स्की यांना बेलारूसमध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तामिळनाडूस्थित मुसिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून वैयक्तिक ग्राहकांकडून पैसे काढण्यावर रु. 5,000 ची मर्यादा लागू केली आहे कारण कर्जदाराच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्जदारावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सने ABSLI निश्चित आयुष योजना लाँच केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी पात्रता ओळखण्यासाठी एक फ्रेमवर्क यंत्रणेवर स्वाक्षरी केली.
स्वच्छ इंधन मिळविण्यासाठी टाटा स्टील मायनिंगने GAIL सोबत सामंजस्य करार केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भोपाळ, मध्य प्रदेश येथे 7 व्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेचे उद्घाटन केले. तीन दिवसीय परिषदेत 15 हून अधिक देश सहभागी होणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला COVID-19 चे व्यवस्थापन करण्यासाठी पोर्टर पुरस्कार 2023 मिळाला.
022 कॅलेंडर वर्षात शहरामध्ये 6.4 टक्के वाढ झाल्यामुळे आलिशान घरांच्या किंमतींच्या जागतिक यादीत मुंबईने 92 वरून 37 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारतीय वायुसेनेने (IAF) जपान हवाई स्व-संरक्षण दल (JASDF) सोबत शिन्युउ मैत्री या सरावात भाग घेतला. 13 फेब्रुवारी 2023 ते 02 मार्च 2023 या कालावधीत कोमात्सु, जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत-जपान संयुक्त सैन्य सराव, धर्मा गार्डियनच्या बाजूला शिन्युउ मैत्री व्यायामाचे आयोजन करण्यात आले आहे. ( capital of Japan is Tokyo ; Currency: Japanese yen)
अभय के. यांचा लघुकथा संग्रह “बुक ऑफ बिहारी लिट्रेचर ” प्रकाशित झाले.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस, जागतिक लठ्ठपणा दिवस & नॅशनल सेक्युरिटी दिवस 04 मार्च 2023 रोजी साजरा केल्या जातो
भारताचे माजी राजनीतीज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते चंद्रशेखर दासगुप्ता यांचे निधन झाले.
भारताचे माजी सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले
03rd March 2023
यूएस स्थित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमुळे अलीकडेच झालेल्या अदानी समूहाच्या समभागांच्या क्रॅशवर जनहित याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एएम सप्रे हे अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या विविध क्षेत्रांवर लक्ष ठेवणाऱ्या समितीचे नेतृत्व करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2023 हा ऋषिकेश येथे गंगेच्या काठावर 1 मार्च ते 7 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2023 हे यंदाच्या भारत पर्वचे मुख्य आकर्षण आहे गंगेच्या काठावर
व्हिएतनामच्या संसदेने व्हो व्हॅन थुओंग यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली. (चलन : Dongs, राजधानी: हनोई)
IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची SSB चे महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ( स्थापना: 20 डिसेंबर 1963 )
जिष्णू बरुआ ऊर्जा नियामक केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे (CERC) नवे अध्यक्ष बनले आहेत.
CMIE च्या आकडेवारीनुसार, भारताचा बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 7.45% पर्यंत वाढला.
गोदरेज आणि बॉयस, रेनमाक्च यांनी भारतीय रेल्वेसाठी ‘मेक-इन-इंडिया’ मूल्य साखळी विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला.
केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अंतर्गत पारंपारिक औषधांवरील पहिल्या B2B ग्लोबल कॉन्फरन्स आणि एक्सपोचे उद्घाटन केले
HDFC बँकेचे शशीधर जगदीशन ‘बीएस बँकर ऑफ द इयर 2022’ म्हणून निवड झाली आहे.
SpaceX ने NASA Crew-6 मिशन लाँच केले.
आशियाई बुद्धिबळ महासंघाने डी. गुकेशला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान केला.
भारताच्या ट्रिपल जम्पर ऐश्वर्या बाबूवर NADA ने चार वर्षांची बंदी घातली आहे.
तामिळनाडूच्या जेस्विन ऑल्ड्रिनने AFI राष्ट्रीय जंप स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडला
जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो
02nd March 2023 :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे एकूण 204 किमी लांबीच्या 2,444 कोटी रुपयांच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.
पुसा कृषी विज्ञान मेळा दरवर्षी भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) द्वारे आयोजित केला जातो आणि यावर्षी तो 2 ते 4 मार्च 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केला होता – “श्री अण्णांसोबत पोषण, अन्न आणि पर्यावरण संरक्षण” ही मेळ्याची थीम आहे (कृषी आणि शेतकरी कल्याण, नरेंद्रसिंग तोमर)
सलहौतुओनुओ क्रुसे आणि हेकानी जाखलू नागालँडमधील पहिल्या महिला आमदार आहेत
नायजेरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून बोला टिनुबू यांची निवड झाली आहे. ( राजधानी: अबुजा & चलन : नायजेरियन नायरा)
जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, तैवानने पुरवठा साखळीसाठी ‘चिप 4’ चर्चा सुरू केली – सेमीकंडक्टर.
फेब्रुवारी 2023 मध्ये 1,49,577 कोटी GST महसूल जमा झाला
HDFC बँक, IRCTC ने भारतातील सर्वात फायदेशीर सह-ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च केले
Axis Bank ने Citibank चा भारतातील ग्राहक व्यवसाय खरेदी करण्याचा करार पूर्ण केला. (अँक्सिस बँकेची स्थापना: 1993, अहमदाबाद, CEO : अमिताभ चौधरी, मुख्यालय: मुंबई)
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्वात अलीकडील चलनविषयक धोरण समिती (MPC) संबोधनादरम्यान सांगितले होते की सर्वोच्च बँकिंग नियामक, बँकांच्या सहकार्याने, QR-कोड आधारित नाणे वेंडिंग मशीनच्या ऑपरेशनचे मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू करेल
भारताने 70 HTT-40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.
भारताने GSMA गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023 जिंकला. (ग्रुप स्पेशल मोबाईल असोसिएशन (GSMA) – GSMA चेअरपर्सन: स्टेफेन रिचर्ड; मुख्यालय: लंडन, इंग्लंड, यूके; स्थापना: 1995)
रिलायन्स जिओ जगातील दुसरा सर्वात मजबूत टेलिकॉम ब्रँड आहे
01st March 2023:
सुरक्षित इंटरनेट सुनिश्चित करण्यासाठी MoS IT ने तक्रार अपील समिती सुरू केली – आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर
नायटेड नेशन्स न्यूक्लियर वॉचडॉगच्या निरीक्षकांना इराणच्या भूमिगत फोर्डो आण्विक साइटवर युरेनियमचे कण 83.7% पर्यंत समृद्ध झाल्याचे आढळले.
भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले परदेशी विद्यापीठ ऑस्ट्रेलियाचे डीकिन विद्यापीठ असेल . स्वायत्त कॅम्पस गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक-सिटी (GIFT) सिटीमध्ये बांधला जाईल . अहमदाबादला भेट देताना, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी नॉर्मन अल्बानीज अधिकृत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
विशाल शर्मा यांची गोदरेज इंडस्ट्रीजच्या केमिकल्स व्यवसायाचे सीईओ-नियुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, वरिष्ठ भारतीय माहिती सेवा (IIS) अधिकारी, राजेश मल्होत्रा यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे प्रमुख महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताचा GDP वाढ 4.4% ने घसरली & मूडीजला 2023 मध्ये भारताची वास्तविक GDP वाढ 5.5% राहण्याची अपेक्षा आहे.
भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) लवकरच इंडोनेशिया, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तुलनात्मक नेटवर्कशी जोडला जाणार आहे
सिंगापूर एअरलाइन्सला $267 दशलक्ष गुंतवल्यानंतर एअर इंडिया समूहातील 25.1% हिस्सा मिळाला – टाटा समूहाचा 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सचा उर्वरित हिस्सा आहे.
मँचेस्टर युनायटेडने काराबाओ कप 2023 चे विजेतेपद पटकावले – लढत मँचेस्टर युनायटेड आणि न्यूकॅसल यांच्यात वेम्बली येथे झाली
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या अहवालानुसार, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
1 मार्च – जागतिक नागरी संरक्षण दिन, शून्य भेदभाव दिवस & जागतिक सीग्रास दिवस म्हणून साजरा केला जातो