मतदार ओळखपत्र (मतदान कार्ड) आधार कार्डशी कसे लिंक करावे – याची संपूर्ण माहिती
ECI (Election Commission of India) नुसार, या अभ्यासाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे हा आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे.
भारतीय निवडणूक आयोग नुसार, मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे तसेच एकच व्यक्ती एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा नोंदणीकृत आहे की नाही हे ओळखणे हा या मोहिमचा उद्देश आहे.
तरिपन, मतदार ओळखपत्र किंवा ई-मतदार ओळखपत्र (EPIC) आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य नाही. आधार क्रमांक सादर न केल्यामुळे कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मोबाईलद्वारे आधार कार्ड EPIC शी ऑनलाइन लिंक करण्यासाठी, ECI ने खालील पायऱ्या सांगितल्या आहेत.
EPIC कार्डधारकाला प्रथम एकतर Google Play Store (Android वापरकर्ते) किंवा App Store (iPhone वापरकर्ते) वरून मतदार हेल्पलाइन अॅप (Voter Helpline App) डाउनलोड आणि स्थापित / Install करावे लागेल.
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, व्होटर हेल्पलाइन अॅप (Voter Helpline App) उघडा आणि “मी सहमत आहे” आणि नंतर “पुढील” वर क्लिक करा. दिसणार्या पर्यायांपैकी, पहिल्या पर्यायावर “मतदार नोंदणी” वर क्लिक करा आणि नंतर “इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6बी)” आणि “लेट्स स्टार्ट” निवडा.
आता, तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा. मोबाईल नंबरवर सेंड केलेला OTP टाका आणि नंतर “Verify” वर क्लिक करा.
यानंतर, पहिला पर्याय निवडा “Yes I have voter ID” आणि नंतर “Next” वर क्लिक करा. आता “Voter ID (EPIC)” क्रमांक प्रविष्ट करा, “राज्य” निवडा आणि नंतर “तपशील आणा” आणि “पुढे जा” वर क्लिक करा.
स्क्रीनवर दर्शविलेले तपशील प्रविष्ट करा आणि नंतर “पुढील” वर क्लिक करा. आता, “आधार क्रमांक”, “मोबाइल क्रमांक”, “अर्जाचे ठिकाण” प्रविष्ट करा आणि नंतर “पूर्ण” क्लिक करा फॉर्म 6B पूर्वावलोकन पृष्ठ प्रदर्शित होईल.
तपशील तपासा आणि फॉर्म – 6B च्या अंतिम सबमिशनसाठी “पुष्टी करा” वर क्लिक करा. अंतिम पुष्टीकरणानंतर फॉर्म 6B चा संदर्भ क्रमांक प्राप्त होईल.
फॉर्म – 6B मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक ECI सोबत शेअर करावा. ते nvsp.in वर ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
लवकरच उपलब्ध होईल